घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपित्याला पाहताच धावली अन् मृत्यूने गाठले

पित्याला पाहताच धावली अन् मृत्यूने गाठले

Subscribe

नाशिक : रस्ता ओलांडत असताना चारचाकी वाहनाची अचानक धडक बसल्याने १४ महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबड लिंकरोड भागात बुधवारी (दि. १) सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमजद अख्तर खान (वय २८, रा. उत्तर प्रदेश) हे पत्नीच्या उपचारासाठी आपल्या चिमुकलीसह नाशिक येथील विराटनगर, अंबड लिंकरोड भागातील नातेवाईकांकडे १५ दिवसापूर्वी आले होते. त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असल्याने आर्थिक बाजू कमजोर असल्याने अमजद हे आपल्या नातलगांसोबत अंबड औद्योगिक वसाहतीत आठ दिवसांपासून मोलमजुरी करत होते. बुधवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अमजद यांची १४ महिन्यांची मुलगी आयजा अमजद खान ही घराबाहेर खेळत होती. कंपनी सुटल्यानंतर चिमुकलीचे वडील अमजद हे घराकडे येत होते. यावेळी चिमुकलीचे लक्ष वडिलांकडे गेले असता ती वडिलांना भेटण्यासाठी धावत निघाली.

- Advertisement -

नेमक्या याचवेळी अचानक समोरून आलेल्या कारची (एम.एच.-15, एच.क्यू.-5686) धडक या चिमुकलीला बसली. या धडकेत चिमुकलीच्या अंगावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. चिमुकली गाडीखाली आल्याचा अंदाजही वाहनचालकाला न आल्याने तो तसाच पुढे निघून गेला. ही घटना पाहताक्षणीच धाव घेतलेल्या स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित कारचालक हसनेन मुज्जमिल खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार रवींद्र पानसरे व दीपक शिंदे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -