ड्रायवरनेच केली अफगाणी धर्मगुरूची हत्या, नाशिक पोलीसांचा खुलासा

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मंगळवारी एका मुस्लिम मांत्रिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. येवला तालुक्यातील चिंचोडी येथील एमआयडीसी परिसरात ही हत्या झाली.

NASHIK

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मंगळवारी एका मुस्लिम मांत्रिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. हत्या झालेली व्यक्ती मूळची अफगाणिस्तानमधील होती. येवला तालुक्यातील चिंचोडी येथील एमआयडीसी परिसरात ही हत्या झाली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदण्यात आला आहे. या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असून ही हत्या त्यांच्या ड्रायव्हरने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्तीची तीघांनी केली हत्या –

येवला तालुक्यात अफगाणिस्तानमधून आलेल्या मुस्लिम मांत्रिक सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती या 35 वर्षीय इसमाचा खून झाला. तीन जणांनी येऊन सैय्यद जरीफ चिश्ती याच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर चिश्ती या विदेशी नागरीकाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरने हत्या केल्याची माहिती दिली आहे.

कपाळावर गोळी लागल्याचे घाव  –

सैय्यद जरीफ चिश्तीच्या कपाळावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर सर्व मारेकऱ्यांनी सैय्यद जरीफ चिश्तीची एसयूव्ही गाडी घेत घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान चिश्तीच्या कपाळावर गोळी लागल्याचे गंभीर घाव आढळून आले आहेत. या प्रकरणात येवला शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.