वर्गमित्रांनी केला घात; व्यसनास भाग पाडत केले ठार

missing mother and son death body found in Drain at laldongari chembur
missing mother and son death body found in Drain at laldongari chembur

वर्गमित्रांनीच एकास व्यसन करण्यास भाग पाडत ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रमिला दिनकर महानकर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋचा महेंद्र भारती (वय २१, रा.खडकी, जि.अकोला), नमित राधेरमण मिश्रा (२२, रा. मुंबई), दीपककुमार झा (२२, रा.बिहार), ऋषभराज सिंहा (२३, रा.बिहार), लक्ष जयस्वाल (२१, रा.छत्तीसगड), मोनिका वळवी (२७, रा.नंदूरबार), ऋषिकेश दराडे (१९, रा.आडगाव, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंकित दिनकर महानकर (वय २१) व संशयित सातजण त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. त्यावेळी संशयितांचे अंकितसमवेत भांडण होत होते. त्यातून संशयितांनी त्यास व्यसन करण्यास भाग पाडले. १५ मार्च २०२१ रोजी संशयितांनी त्याला धमकी देत ठार केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करत आहेत.