घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअतिक्रमण काढल्यावरून उपमुख्याधिकार्‍यास मारहाण, साहित्यांची तोडफोड

अतिक्रमण काढल्यावरून उपमुख्याधिकार्‍यास मारहाण, साहित्यांची तोडफोड

Subscribe

दोन नगरसेवकांसह सातजणांवर गुन्हे दाखल

कोपरगाव शहरातील पूनम थिएटर जवळील अतिक्रमण काढल्याचा रागातून दोन नगरसेवकांसह सातजणांनी कोपरगाव नगरपालिका कार्यालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून उपमुख्याधिकार्‍यांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.२२) घडली आहे. याप्रकरणी दोघा नगरसेवकांसह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोपरगाव पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या आदेशानुसार शहरातील पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या दोन टपर्‍या कढण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ गुरुवारी सकाळी गेले. त्यावेळी त्यांना सनी रमेश वाघ, योगेश तुळशीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निळंक यांनी दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी पालिका कार्यालयातील बांधकाम विभागातील संगणक, खुर्ची आणि काचा फोडून नुकसान केले. तसेच उपमुख्याधिकारी गोर्डे यांना शिवीगाळ व मारहाण करून आरडाओरड केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सातजणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळासह विविध कलमांव्ये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. सी, नागरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -