घरक्राइमएटीम कार्डची अदलाबदली; ७१ हजारांना गंडा

एटीम कार्डची अदलाबदली; ७१ हजारांना गंडा

Subscribe

एटीएम कार्डची अदलाबदली दोनजणांनी विविध एटीएम सेंटरमधून ७० हजार ६२३ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी कैलास युवराज पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कैलास पाटील वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढत होते. त्यावेळी अनोळखी दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांची नजर चुकवून एटीएमची अदलाबदली केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७० हजार ६२३ रुपये काढून घेतले. संशयितांनी अंबड शाखेतील एटीएममधून तीन टप्प्यात काढलेले १८ हजार रुपये, डेक्कन ऑटोमोबाईलमध्ये दोन टप्प्यात १५ हजार रुपये, आडगाव शाखेतून ७ हजार २३ रुपये काढून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -