घरमहाराष्ट्रनाशिकवडाळारोडवर पेट्रोलपंप व्यवस्थापकावर हल्ला, कर्मचाऱ्यांना मारहाण

वडाळारोडवर पेट्रोलपंप व्यवस्थापकावर हल्ला, कर्मचाऱ्यांना मारहाण

Subscribe

बाटलीत आणलेल्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे केला हल्ला, मुंबई नाका पोलिसांनी दाखल केला गुन्हा

इंदिरानगर-वडाळारोडवरील एम. एस. देवरे पेट्रोलपंपावर आलेल्या तरुणांनी येथील व्यवस्थापकावर हल्ला करतानाच कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याची घटना शनिवारी, ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. बाटलीमध्ये आणलेल्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे सांगत या टोळक्याने काहीही न ऐकता थेट मारहाण सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबई नाका पोलिसांनी वडाळा भागातील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पावसाळी वातावरणामुळे शक्यता

भारत सरकारच्या नियमानुसार पेट्रोलमध्ये इथेनाल मिश्रित केले जाते. इथेनॉल पाण्याकडे आकर्षित होणारे असते. एवढेच नव्हे तर इथेनॉल वातावरणातील पाणी ओढुन घेते. पेट्रोल टाकीचा पाण्याशी अथवा बाहेरील हवामानासोबत संपर्क आला तर पेट्रोल व इथेनॉल वेगळे होतात. अशा वेळी चाचणीचे शास्त्रीय पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतात. ग्राहकांच्या विश्वासावरच अखंड सेवा सुरू असते. हा विश्वास ग्राहकांनीही कायम ठेवावा. – भूषण भोसले, अध्यक्ष, पेट्रोल असोसिएशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -