घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमित्राने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून लाकडी दांडक्याने हल्ला

मित्राने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून लाकडी दांडक्याने हल्ला

Subscribe

नाशिक : शहरातील खडकाळी, गंजमाळ भागात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून राग आल्याने एकाने मित्राला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

निखील विनोद कंडारे (वय २१, रा. रॉयल हेरिटेज हॉटेलच्या मागे, पंचशीलनगर, गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर रिजवान अनिस शेख (वय २६, रा. पंचशिलनगर, गंजमाळ) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो रविवारी (दि.१७) सायंकाळच्या वेळेस भाजीपाला घेण्यासाठी गेला असताना भाजीपाला घेवून घरी परतताना खडकाळी सिग्नल भागातील देशी दारू दुकानसोमरून जाताना संशयिताने त्याला अडवले. यावेळी त्याच्याकडून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. रिझवानने पैसे देण्यास नकार देताच संशयिताने शिवीगाळ करत त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच खिशातील धारदार वस्तू डोक्यात मारत रिझवानला गंभीर जखमी केले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक माळी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -