घरमहाराष्ट्रनाशिकत्या तरुणीच्या मारेकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

त्या तरुणीच्या मारेकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

लग्नानंतरही आईकडे राहत असल्याच्या रागातून पायल परदेशी या तरुणीचा तिच्याशी लग्न करणाऱ्या जयेश दामोधर याने पायलचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर फरार असलेल्या जयेशला गंगापूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने विषारी गोळ्या घेतल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले.

पंचवटीतील पायल परदेशी या तरुणीच्या खूनप्रकरणातील फरार संशयित आरोपी जयेश रामचंद्र दामोधर याने शुक्रवारी (दि.११) विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला अटक करण्यासाठी राजीव गांधी भवन परिसरात सापळा रचलेल्या पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन सिव्हिलमध्ये दाखल केले.

पंचवटीतील हिरावाडीत राहत असलेल्या जयेश याने घरून पैसे घेऊन पळ काढला होता. तो सतत मित्रांशी संपर्कात राहून पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता आणि पोलिस त्याच्या मागावर होते. शुक्रवारी (दि.११) दुपारी हाती आलेल्या माहितीवरून पोलिसांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवन परिसरात सापला रचला होता. जयेश दिसताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. याच वेळी त्याने उंदीर मारण्याच्या गोळ्या घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले. रात्री त्याची प्रकृती नियंत्रणात होती.

- Advertisement -

अशी घडली घटना

पंचवटी कॉलेजमागील तपोवन भागात राहणाऱ्या पायल परदेशी (२०) ही तरुणी कॉलेजरोडवरील एका कपड्याच्या दुकानास कामाला होती. मंगळवारी (दि.८) रात्री दुकान बंद झाल्यानंतर ती घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. बुधवारी दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह एका इमारतीच्या गच्चीवर आढळून आला होता. पायलची आई सरला यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुलगी पायल हिचा जयेश रामचंद्र दामोधर याच्याशी विवाह झालेला होता. मात्र, जयेश हा पायलशी भांडण करून तिला उपाशी ठेवत. तिला मारहाण करत असे. त्यामुळे पायल सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती. सोबत राहण्यात तयार नसल्याच्या रागातून जयेशने तिचा खून केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -