Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेशाचा प्रयत्न; ब्राह्मण महासंघाचा आंदोलनाचा इशारा

त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेशाचा प्रयत्न; ब्राह्मण महासंघाचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

ब्राम्हण महासंघाकडून एक पत्र पोलीस निरीक्षकांना लिहिण्यात आले आहे. या पत्रात ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसचं, या प्रकरणावर योग्य ती कारवाई लवकरात लवकरत करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. तसचं, कारवाई योग्य वेळेत झाली नाही तर ब्राम्हण महासंघाकडून  तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

नाशिक: ब्राह्मण महासंघाकडून एक पत्र पोलीस निरीक्षकांना लिहिण्यात आले आहे. या पत्रात ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसचं, या प्रकरणावर योग्य ती कारवाई लवकरात लवकरत करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. तसचं, कारवाई योग्य वेळेत झाली नाही तर ब्राह्मण महासंघाकडून  तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. ( Attempted entry into Trimbakeshwar temple by other religious Brahmin Federation warns of agitation )

नेमंक प्रकरण काय?

त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मियांनी 13 मे 2023 ला उत्तर महादरवाजातून घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर संघटनेकडून करण्यात आला आहे. स्थानिक संघल निमित्त एक मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीवेळी काही इतर धर्मीय लोकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं ब्राह्मण महासंघानं म्हटलं आहे, असं पत्र महासंघाकडून स्थानिक पोलिस निरिक्षकांना लिहिण्यात आलं आहे.

पत्रात काय?

- Advertisement -

13 मे 2023 रोजी रात्री 9:30 ते 10 या वेळेत श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणूकीतील काही इतर धर्मीय व्यक्तींनी उत्तर महादरवाजा येथून समस्त हिंदूधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट अत्यंत गंभीर असून वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महासंघाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसचं असे प्रकार भविष्यात होणार नाही यांची दक्षता घ्यावी, अशी विनंती या पत्रातून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.

( हेही वाचा: महाराष्ट्रात सुरू असलेल्या दंगली हा भाजपचा लोकसभेचा प्लॅन; खैरेंचा गंभीर आरोप )

राज्यात दोन ठिकाणी दंगली

- Advertisement -

अकोला शहरात शनिवारी रात्री अचानक दोन गटात मोठा राडा झाला होता. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका पोस्टमुळे ही घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच, शनिवारी रात्री झालेल्या या दंगलीत शहरातील अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांना दंगलखोरांनी आग लावत जाळपोळ केली. या घटनेनंतर अकोला शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडून देण्यात आले. सध्या या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाली. या दगडफेकीत संबंधीत परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून, या दगडफेकीत 4 पोलीस जखमी झाले आहेत

 

- Advertisment -