Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक साडेतीन हेक्टर जमिनीचा १.३१ कोटींना लिलाव

साडेतीन हेक्टर जमिनीचा १.३१ कोटींना लिलाव

Subscribe

आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी आजवरच्या इतिहासात प्रथमच वाडगांव गिरणारे येथील थकबाकीदार सभासदाच्या जमिनीचा थेट लिलाव केला आहे.

आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी आजवरच्या इतिहासात प्रथमच वाडगांव गिरणारे येथील थकबाकीदार सभासदाच्या जमिनीचा थेट लिलाव केला आहे. विविध कार्यकारी संस्थेचे थकबाकीदार खंडेराव भागुजी कातड यांच्याकडे बँकेचे ४२ लाख रुपये थकित असून त्यासाठी गुरुवारी (ता. ११) नाईकवाडी गिरणारे येथील क्षेत्र ३ हेक्टर ५६ आर जमिन एक कोटी ३१ लाख रुपयाना विकली. संतोष पाटील यांनी ही जमीन खरेदी केली असून बँकेला अडीच लाख रुपयांचा रोख भरणा देखील केला आहे.

जिल्हा बँकेने धडक वसुली मोहीम हाती घेतल्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. वाडगाव गिरणारे आदिवासी संस्थेचे सभासद खंडेराव भागूजी कातड व इतर चौघांकडे सुमारे ४२ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. कर्जवसुलीस त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बँकेने कायदेशीर मार्गाने त्यांची जमीन जप्त करून लिलावासाठी सहाय्यक निबंधकांची मंजुरी घेतली. त्यांनी मंजुरी दिल्यांनतर सभासदास ७ दिवसांची अंतिम मुदत नोटीस देण्यात आली होती. मात्र, खंडेराव कातड यांनी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे त्यांची नाईकवाडी शिवारातील जमिनीचा थेट लिलाव करण्यात आला. इच्छुक खरेदीदार संदिप थेटे, बाळासाहेब पाटील व संतोष पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. संदीप थेटे यांनी १ कोटी ३० लाखांपर्यत किंमत लावली. बाळासाहेब पाटील यांनी १ कोटी २६ लाख ५० लाखपर्यत किंमत लावली. तसेच संतोष पाटील यांनी १ कोटी ३१ लाखापर्यंत लिलाव नेल्यमुळे जमिनीचा मालकी हक्क त्यांना मिळाला. संतोष पाटील यांनी २ लाख ५० हजारांचा रोख भरणा केला व सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचा १९ लाख ६५ हजार रुपयाचा धनादेश बँकेच्या गिरणारे शाखेत जमा करून उर्वरीत रक्कम ३० दिवसाच्या आत भरणा करण्याचे मान्य केले आहे. बँकेच्या वतीने शेती कर्जे वसुली विभागाचे व्यवस्थापक विलास बोरस्ते, प्रभाकर ढगे, शेलेश पिंगळे, नाशिक विभागीय अधिकारी धनवटे, भास्कर बोराडे, वसुली अधिकारी खुरकुटे उपस्थित होते.

४० एकरचा जाहीर लिलाव

- Advertisement -

नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच शिलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे २ लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यांना सात दिवसाची नोटीस बजावण्यात आली असून, त्यानंतर थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या जमिनीचा लिलाव केला जाणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -