घरमहाराष्ट्रनाशिकआत्या भाच्याची रेल्वेखाली आत्महत्या

आत्या भाच्याची रेल्वेखाली आत्महत्या

Subscribe

मृत महिला जेलरोड भागातील तर भाचा सिन्नर तालुक्यातील

नाशिकरोड येथील एकलहरे नाशिकरोड शिवारात आत्या व भाच्याने रेल्वे खाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या जोरदार धडकेने दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आले, पोलीस तपासात मृत महिला जेलरोड भागातील असून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील त्यांचा भाचा असल्याचे समोर आले, आत्या-भाच्याने एकत्रीत केलेल्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, नाशिकरोड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकरोड-ओढा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शनिवारी (दि.२१) सकाळी १०.४० वाजता नाशिकरोड वरुन भुसावळ कडे जाणा-या रेल्वेखाली दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती ओढा रेल्वे स्टेशनचे उप प्रबंधक प्रमोद क्षत्रिय यांनी नाशिकरोड पोलिसांना दिली, नाशिकरोड पासून डाऊन लाईनवरील किलोमीटर क्रमांक १९२/०२ या ठिकाणी रेल्वे ट्रकवर दोन मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. महिला व पुरषांचे मृतदेह असलेल्या ठिकाणापासून जवळच रस्त्यावर एक दुचाकी (एमएच १५ एफ वाय ५३५८) पोलिसांना मिळून आली. सदर महिला जेलरोड येथील शोभा गंगाधर गोराडे (५१) रा. जेलरोड व त्यांचा भाचा रोषन बाळासाहेब नरवडे (२४) रा. पाथरे, ता. सिन्नर अशी आत्महत्या केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्या भाच्याच्या आत्महत्तेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष घुगे व सचीन झाडे हे तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -