घरमहाराष्ट्रनाशिकअवयवदान जनजागृती गरजेची - कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर

अवयवदान जनजागृती गरजेची – कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर

Subscribe

आरोग्य विद्यापीठाच्यावतीने जनजागृती रॅली

ज्या रूग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाली आहेत अशा अनेक रूग्णांसाठी अवयवदान हाच एक आशोचा किरण आहे. त्यामुळे अवयवदान जनजागृती करणे गरजेचे असून याकरीता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. अवयवदान जनजागृती महारॅलीच्यानिमित्ताने आयोजित करण्यात कार्यक्रमात ते बोलत होते.

अवयवदान जनजागृती महारॅलीचा प्रारंभ इदगाह मैदान येथून करण्यात आला. अवयवदान महादान, मरावे परी अवयवरूपी उरावे, अवयवदान श्रेष्ठदान, बी डोनर बी हिरो, मृत्युला रोखण्याची ताकद तुमच्या श्रेष्ठ दानात आहे अशा घोषणा आणि ढोलपथकाच्या नादात परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथी वैद्यकिय महाविद्यालय, भोसला इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले. जिल्हा परिषद मार्गे कालिदास कला मंदिर, आय.एम.ए हॉल, शालीमार, परशुराम सायखेडकर नाटयगृह, महात्मा गांधी रोड, शासकिय कन्या महाविद्यालय या मार्गावरून छत्रपती शिवाजी मैदान येथे रॅलीचा समसरोप करण्यात आला. यावेळी बोलतांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, अवयवदान हे एक महान काम आहे. अवयवदान ही काळाची गरज आहे. याकरीता सर्वांनी जनजागृती करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले की, सद्यस्थितीत देशात लाखो रूग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. याकरीता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाययाने मानवी अवयव प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. ज्या व्यक्तींना अवयवदान करायचे आहे त्यांनी जवळील रूग्णलयात नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शिक्षण विभाग सहायक संचालक पुष्पा पाटील, डॉ. मनिषा रौंदळ, डॉ. संजय रकिबे, पुनम देशमुख, राजू व्यास, डॉ. बाळासाहेब घुले, एन.व्ही.कळस्कर, डॉ. संदिप गुंडरे, नाना गायकवाड, आदिंसह विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापक, प्रचार्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -