बाभळेश्वरला वीज पडून एक एकर ऊस खाक

विजेच्या प्रचंड आवाजानंतर लगेचच शेतातनं धूर निघू लागला. हे पाहताच टिळेंनी शेताकडे धाव घेतली, सोसाट्याचा वारा असल्याने काही मिनिटांत संपुर्ण शेत जळून खाक झालं.

sugarcane gutted in fire
ऊसाच्या शेताला आग

नाशिकरोडपासनं जवळच असलेल्या बाभळेश्वर परिसरात वीज पडून एक एकरावरचा ऊस जळून खाक झाला. मंगळवारी सायंकाळी पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी मोहगाव-बाभळेश्वर रस्त्यालगतच्या शिवाजी शंकर टिळे यांच्या ऊसाच्या शेतात वीज पडली. विजेच्या प्रचंड आवाजानंतर लगेचच शेतातनं धूर निघू लागला. हे पाहताच टिळेंनी शेताकडे धाव घेतली, सोसाट्याचा वारा असल्याने काही मिनिटांत संपुर्ण शेत जळून खाक झालं. घटनेची माहिती गावात समजताच शेकडो ग्रामस्थांनी पेटलेला ऊस विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, वार्‍यामुळे ते अपयशी ठरले. दरम्यान, या नुकसानीचा पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.