घरमहाराष्ट्रनाशिकभगूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; वासराचा घेतला बळी

भगूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; वासराचा घेतला बळी

Subscribe

भगूर परिसरातील विजयनगर शिवारातील रामकिसन भिकाजी करंजकर यांच्या मळ्यातील घटना

भगूर परिसरातील विजयनगर शिवारातील रामकिसन भिकाजी करंजकर यांच्या मळ्यात रात्री घराजवळ बांधलेल्या वासरावर रात्री एक वाजता हल्ला करत बिबट्याने वासराचा फडशा पाडला. बिबट्याच्या या धुमाकूळाने शेतकरी वर्गात मात्र मोठी दहशत निर्माण झाली आहे.

विजयनगर परिसरातील करंजकर वस्तीवर नेहमीच बिबट्याचा संचार दिसून आला आहे. यापूर्वीही भरदिवसा अनेकांनी बिबट्या पाहिला आहे. त्यातच आता घराजवळ बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याची घटना घढली. वनविभागाने पाहणी करून योग्य त्या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरी रामकिसन करंजकर, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, योगेश करंजक, गोविंद करंजकर, विजय करंजकर, अंबादास पाटील, सुखदेव कुटे, परसराम कुटे, जगन करंजकर, सुनील करंजकर, संदीप करंजकर, राहुल करंजकर, अरुण करंजकर आदींसह स्थानिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -