घरमहाराष्ट्रनाशिकवंचितांच्या सत्तेसाठी विचारांमध्ये समानता आणा - डॉ. प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

वंचितांच्या सत्तेसाठी विचारांमध्ये समानता आणा – डॉ. प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

Subscribe

राफेल प्रकरणी संसदेत कॅग ने सादर केलेल्या अहवालात भाजप सरकारने यूपीए सरकार पेक्षा १७ टक्क्यांनी विमान स्वस्त खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र कॅग प्रशासन हे भाजपा विचारांचे असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मालेगावातील सभेत भाजपसह काँग्रेस व इतर पक्षांवर ताशेरे ओढले.

राफेलप्रकरणी संसदेत कॅग ने सादर केलेल्या अहवालात भाजप सरकारने यूपीए सरकारपेक्षा १७ टक्क्यांनी विमान स्वस्त खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, कॅग प्रशासन हे भाजपा विचारांचे असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासह काँग्रेस व इतर पक्षांवर ताशेरे ओढले. या देशात वंचितांची सत्ता आणायची असेल तर विचारांमध्ये समानता आणावी लागेल. राज्यात आणि देशातील मनुवादी सरकारला वंचित आघाडी खाली खेचून आपली सत्ता आणेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मालेगावातील पोलीस कवायत मैदानावर बुधवारी, १३ फेब्रुवारीला भारिपच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंबेडकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महासचिव विनोद भुईगळ, भारिपचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे, एमआयएम शहराध्यक्ष डॉ. खालिद परवेज, ग्रामगारुडी समाजाचे शांताराम बोरसे, आदिवासी समाजाचे अरुण गायकवाड, धनगर समाजाचे ज्ञानेश्वर ढेपले, चर्मकार उठाव संघाचे अनिल जाधव, हसीम कमाल, किसनराव चव्हाण आदीसह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभीच त्यांनी कमाल हाशमी यांना धुळे मालेगाव लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली. यावेळी बोलतांना आंबेडकर म्हणाले, इतर पक्ष वंचित समाजाला उमेदवारी देत नाही मात्र बहुजन आघाडीने धुळे मालेगाव लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देऊन वंचितांसाठी लोकसभेचे द्वार उघडे करून दिलेत. काँग्रेस व सत्ताधारी भाजप यांनी आजवर समाजातील बहुजन वंचितांच्या हाती सत्ता येऊ दिली नाही. एक कुटुंबापुरती सत्ता मर्यादित राहिली. या देशातील लोकशाही कैद करण्याचा प्रयत्न आजवर झाला आहे. गेल्या सत्तर वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काँग्रेसकडून लगाम लावण्यात आलेला नाही. तर सध्या राज्यात व देशात असलेले सरकार हे धर्मवादी व मनुवादी सरकार असून या सरकारला खाली खेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी केले. कांदा प्रश्न, राफेल करार, एमआयएमशी युती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा विविध विषयांवर आपले विचार मांडलेत.

- Advertisement -

काँग्रेससोबत युती करण्यासाठी आरएसएस संघटनेला घटनेच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र तीन महिने झाले अद्याप आराखडा काँग्रेसने दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेससोबत युती करण्यासाठी जागांचा प्रश्न महत्वाचा नसून बेलगाम असलेल्या आरएसएसला कसा पायबंद घालाल हा आहे. देशात सध्या सरसंघचालक मोहन भागवत यांचा कायदा चालत असून त्यांचीच मनमानी सुरु असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. मालेगावच्या कापड उद्योगात मुस्लीम समुदाय असल्यानेच या व्यवसायाला कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. हे सरकार धार्मिक विचारांचे सरकार आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने देशातील रोजगार व्यापार यांनी संपवला आहे. कांद्याला हमीभाव दिल्याचे सरकार म्हणत असले तरी तो शेतक-यांना मिळेल यासाठीची कुठली हि यंत्रणा देशात नाही. आधीची सरकारे सरळ खात होती हे सरकार वाकड्या हाताने खाणारे असून चोरांचे सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. देशात वंचितांची सत्ता आणायची असेल तर विचारांमध्ये समानता आणावी लागेल. राज्यात आणि देशातील मनुवादी सरकारला वंचित आघाडी खाली खेचून आपली सत्ता आणेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सभेस एमआयएम नेते असोद्दिन ओवेसी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

Malegaon
मालेगावातील जाहीर सभेला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -