घरताज्या घडामोडीसत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा, पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

सत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा, पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

Subscribe

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज विविध प्रकारच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाच विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीला सुरूवात झाली आहे. यापैकी दोन मतदार संघातले निकाल हाती आले आहेत. अशातच नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात चुरशीची लढाई ठरत आहे. सध्याच्या परिस्थितीत सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत. तर शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. दरम्यान, सत्यजित ताबेंना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर थोरात साखर कारखाना गेट, घुलेवाडी या ठिकाणी सत्यजित तांबेंच्या विजयाआधीच बॅनर लागले आहेत. तसेच या बॅनरवर बाळासाहेब थोरात यांचा फोटो असल्यामुळे चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

- Advertisement -

सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरल्याने काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या विजयाआधीच पोस्टर झळकल्याने आणि विशेषत: या पोस्टरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा फोटो असल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे तर्क लावण्यात येत आहेत.

- Advertisement -

कोकणात भाजपाने विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. यंदा राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २० हजार ८०० मतं मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मतं मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ११ हजार ३०० मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे.


हेही वाचा : शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे, कोकणात म्हात्रेंच्या विजयानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -