घरमहाराष्ट्रनाशिकस्व. बंडोपंत जोशी : संघ ते जनसंघ, जनसंघ ते भाजप

स्व. बंडोपंत जोशी : संघ ते जनसंघ, जनसंघ ते भाजप

Subscribe

शहरात भाजपच्या वेलीचे वटवृक्षात रूपांतर करणारे तसेच, नाशिकमधील असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना तावून सुलाखून त्यांच्यात राष्ट्रहित, समाजसेवा, आदर्शवत मूल्यांची बीजे रोवणारे, त्यांना घडवणारे जेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा अर्थात स्व. बंडोपंत जोशी. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा हा परिचय..

राष्ट्रहित सर्वतोपरी मानून प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून राष्ट्रासाठी आणीबाणीच्या काळात १८ महिने कारावास भोगून देशसेवेचे महत्कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही दादांचा सर्वदूर परिचय आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या लक्ष्य अंत्योदय हे ब्रीद दादांनी सातत्याने आचरणात आणले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेल्या दादांचा प्रवास जनसंघापासुन सुरू झाला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पक्ष, नाशिक शहराचे माजी शहराध्यक्ष, तसेच नाशिक महापालिकेतील माजी सभागृहनेते अशी विविध पदे त्यांनी भूषविली. या वाटचालीत त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले.

- Advertisement -

४५ वर्षांपूर्वी आणीबाणी काळात ते मिसाअंतर्गत १८ महिने नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध होते. त्याचकाळात त्यांना स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे बाबा भिडे, प्रल्हाद अभ्यंकर, मोहन धारीया, प्रा. राम कापसे, सावंतवाडीचे डॉ. देशपांडे अरविंद लेले आदी मान्यवरांचा सहवास लाभला. नाशिक शहरात एकेक कार्यकर्ता आपल्या संघटन कौशल्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहात जोडण्याचे कार्य करत पक्षाचा वटवृक्ष मोठा करणार्‍या दादांच्या स्मृती आजही पक्षातील प्रत्येकाच्या मनात कायम आहेत. स्व. दादांच्या जयंतीनिमित्त संघजन प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या वतीने विनम्र अभिवादन!

लेखन : प्रदीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -