मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये बॅनर

राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या शिवसैनिकांनी पंचवटीत फलक लावले आहेत. कितीही नेते सोडून गेले तरी शिवसैनिक सदैव उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहतील, असा विश्वास नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड करत काही मंत्री आमदारांना घेवून सूरतला रवाना झाला. त्यामुळे मंगळवारी (दि.21) सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा सरकारवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना नाशिकमधील शिवसेनेचे विभागप्रमुख योगेश बेलदार यांनी शिवसेनेच्या समर्थनार्थ फलक लावले आहेत.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी एकनिष्ठपणा काय असतो, हे सांगितले आहे. पण आता एकनाथ शिंदे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे की, आनंद दिघे साहेबांनी हेच संस्कार तुमच्यावर केले का?
-योगेश बेलदार, विभागप्रमुख, शिवसेना