सावधान ! थोड्याच वेळात ‘निसर्ग’ वादळ नाशिक जिल्हयात

बुधवारी दुपारी दोन नंतर धडकणार: या तालुक्यांना तडाखा

पहिल्या पावसाने ठाणेकर सुखावले

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने त्याचा वेग वाढवला आहे, त्यामुळे बुधवारी रात्री ११ वाजता येणारे हे वादळ नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.३) दुपारी दोन ते तीन नंतर धडकणार आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, नाशिक, चांदवड, मालेगाव या तालुक्यांमध्ये या वादळाची तिव्रता अधिक राहणार असून इतर लगतच्या तालुक्यांमध्येही त्याचा प्रभाव जाणवणार आहे. या आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्याधिकारी सूरज मांढरे यांच्या नागरिकांना सुचना | Suggestions to the citizens of Nashik District Collector Suraj Mandhare

नाशिक जिल्ह्याधिकारी सूरज मांढरे यांच्या नागरिकांना सुचना | Suggestions to the citizens of Nashik District Collector Suraj Mandhare

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜೂನ್ 3, 2020

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग हे चक्रीवादळ ताशी १०० ते १२५ किलोमीटर वेगाने प्रवास करीत असून ते बुधवारी दुपारी एकला अलिबागच्या किनार्‍यावर धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचा वेग पाहता निसर्ग वादळ नाशिक जिल्ह्यात दुपारी दोन ते तीन दरम्यान धडकणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी या आधीच प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान चक्रीवादळाच्या आधीच नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून रिमझिम स्वरुपात पडणार्‍या पावसाने सकाळी अकरानंतर जोर धरला आहे. या चक्रीवादळाच्या काळात नागरिकांनी पुढील खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

 • नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
 • घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी किंवा सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे.
 • घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास या वस्तूंपासून दूर राहावे.
 • आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे.
 • केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु आपल्या सोबत ठेवाव्यात.
 • हवामान खात्याकडून मिळणारे इशारे व माहितीसाठी जवळ रेडीओ बाळगावा व त्याद्वारे माहिती घ्यावी.
 • सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
 • बाल्कनीमधील फुलांची भांडी, कुंड्या व इतर जड साहित्य तात्काळ सुरक्षित कराव्यात.
 • काचेच्या खिडक्या ढिल्या असतील तर तत्काळ दुरुस्त करा.
 • वाहनावर झाडे व इतर साहित्य पडू नये यासाठी वाहने सुरक्षित करा.
 • दुचाकी मुख्य स्टँडवर उभी करा.
 • बॅटरी, पॉवर बँक, चार्जिंग करून ठेवा. जखमांसाठी आवश्यक औषधे व रुग्णाची औषधे सुरक्षित रुग्णाच्या बेड जवळ ठेवा.
 • विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी.
 • वॉटर प्युरिफायरमध्ये विजेचे नुकसान झाल्यास पुरेसे पिण्याचे पाणी साठा करून ठेवा.
 • शुजरॅक चांगल्या प्रकारे बोल्ट कराव्यात, सर्व शूज व इतर वस्तू चांगल्या प्रकारे एकत्र करून सुरक्षित केल्या पाहिजेत.
 • डिश टीव्ही व्यवस्थित घट्ट किंवा पक्के करा.
 • एअर-कंडिशनर बाह्य युनिट्स पक्के करून घ्या .
 • शेतकर्‍यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा
 • झाडाखाली उभे राहू नका व झाडाखाली वाहने लावू नका.
 • पत्र्याच्या शेड खाली उभे राहू नका
 • अधिक माहितीसाठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा.