घरमहाराष्ट्रनाशिकप्रभू श्रीरामाला ३२ हाती फेटा; २७ वर्षांपासून ‘पाटोत्सवा’ची परंपरा

प्रभू श्रीरामाला ३२ हाती फेटा; २७ वर्षांपासून ‘पाटोत्सवा’ची परंपरा

Subscribe

नाशिक : आमलकी एकादशीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रभु श्री रामांना ३२ हात पांढराशुभ्र फेटा बांधण्यात आला. गेल्या २७ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते. या सोहळयाला ‘पाटोत्सव’ असे म्हटले जाते. काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, श्रीमहंत सुधीरदास पुजारी, दिपक कुलकर्णी यांनी हा विधी संपन्न केला. फेटा नेसवण्याआधी रामचंद्रांना १६ पुरूषसुक्ताव्दारे महापुजा करण्यात आली. त्यानंतर विधीपूर्वीक पांढरा झगा, सीता मातेला साडी चोळी नेसवून श्री रामांना फेटा बांधायला सुरूवात करण्यात आली. फेटा बांधण्यास तब्बल दोन तासांचा अवधी लागला. ही परंपरा पुजारी घराण्यातील २७ पिढीच्या वारसांकडून गेली अनेक शतके अखंड पालन केली जात आहे. श्वेतवस्त्रातील रामाचे दर्शन मोठे पुण्यकारक सांगितले आहे. एरव्ही ११ महिन्यातील सर्व एकादशीला रामरायांना पितांबर नेसवले जाते. केवळ फाल्गुन मासात प्रभु श्री रामाला पांढरे वस्त्र नेसवले जाते. पांढरा रंग उष्णता परावर्तित करतो. अशातच उन्हाळयात त्रास होऊ नये म्हणून पांढरे वस्त्र नेसवले जाते.

३२ हाती फेटा का?

३२ ही संख्या अनुष्टुप छंदा चे रूप आहे वेदातील पुरूषसुक्त रामरक्षा पवमानसुक्तांतील बहुतांशी ॠचा याच छंदात आल्या आहे. चारही वेदातील स्तुती मंत्र अनुष्टुपछंदात आहे. या छंदातील स्तुती ने प्राणरूपी देवता प्रसन्न होतात, म्हणून देवतांना देखील या छंदातील स्तुती आवडते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -