घरमहाराष्ट्रनाशिकसांगलीची पुनरावृत्ती नाशिकमध्येही! मुलं चोरणारी टोळी समजून दोन ब्लँकेट विक्रेत्यांना मारहाण

सांगलीची पुनरावृत्ती नाशिकमध्येही! मुलं चोरणारी टोळी समजून दोन ब्लँकेट विक्रेत्यांना मारहाण

Subscribe

नाशिक : पालघरमधील साधूंच्या हत्याकांडानंतर सांगलीतही या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे. सांगलीत जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर सांगलीतील याच घटेनेची पुनरावृत्ती आता नाशिकमध्येही पाहायला मिळाली. नाशिकमध्येही मुलं पळवणारी टोळी समजून ब्लँकेट विकणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. (beaten up as a gang of child abductors in nashik)

नाशिकमधील टाकळीरोड परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी मारहाण झालेल्या तरुणांची चौकशी केली. यात दोन्ही ब्लँकेट विक्रेत्यांची कागदपत्रे तपासली. या चौकशीत संबंधित ब्लँकेट विक्रेते मुलं चोरणारी टोळी नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल न करता सोडून दिले आहे.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या टाकळी परिसरात ब्लँकेट विकत असताना परिसरातील कर मोगल साळवे नामक व्यक्तीच्या लहान मुलाने ब्लँकेट ओढले. जे पाहून ब्लँकेट विकणाऱ्याला राग आला होता. यावेळी रागाच्या भरात विक्रेत्याने लहान मुलाचा गळा धरला, जे परिसरातील नागरिकांना पाहिले. या प्रकरामुळे उपस्थितांना ही मुलं पळवणारी टोळी तर नाही ना असा संशय आला. या संशयावरून उपस्थितीतांनी ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण केली आहे.

महाराष्ट्रात सातत्याने गैरसमतीतून मारहाणीच्या घटना समोर येत आहे. मुलं पळवणारी किंवा चोराची टोळी समजून स्थानिकांकडून मारहाण केली जात आहे. यात पालघरमध्येही दोन वर्षांपूर्वी मुलं पळवणारी टोळी समजून साधू महतांची हत्या करण्यात आली. ज्यावरून मोठं राजकारण रंगले. यात आता सांगलीतही मुलं पळवणारी टोळी समजून चार साधूंना मारहाणीची ताजी घटना समोर आली आहे. यापूर्वी धुळे- जळगावमध्येही याच प्रकारची घटना समोर आली होती. यापाठोपाठ आता नाशिमध्येही अशा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.


कथित 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांची होणार CBI चौकशी; राज्य सरकारची संमती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -