घरताज्या घडामोडीभद्रकाली पोलिसांकडून ८ दुचाकी जप्त

भद्रकाली पोलिसांकडून ८ दुचाकी जप्त

Subscribe

नाशिक शहरात दुचाकी चोरणार्‍या दोन चोरट्यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुनील बाळासाहेब देशमुख (३०, रा.इमामशाही दर्ग्यामागे, सारडा सर्कल, नाशिक), जाकीर अख्तार शेख (३६, रा.खडकाळी, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

विजय पालवा यांची दुचाकी (एमएच१५-सीआर१९०४) ३१ मे रोजी सीबीएस येथील जनता बँकेच्या परिसरातून चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी पालवा यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी ५ जून रोजी सुनील देशमुख यास अटक केली. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने साथीदार जाकीर शेख याच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शेख यास अटक केली. पोलिसांनी शेख याच्याकडून पाच व सुनील देशमुख याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, दत्ता पवार, ज्ञानेश्वर मोहिते, राजेंद्र मोजाड, संतोष पवार, कय्युम सैय्यद, आशिष गायकवाड यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -