घरमहाराष्ट्रनाशिकभाम धरण ओव्हर फ्लो

भाम धरण ओव्हर फ्लो

Subscribe

विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ, आमदार खोसकरांच्या हस्ते जलपूजन

इगतपुरी तालुक्याचा राष्ट्र उभारणीत मोलाचा सहभाग आहे. अनेक प्रकल्प या ठिकाणी असताना विकासाचा महामेरू आमदार हिरामण खोसकरांच्या रूपाने धावता ठेवण्यासाठी मी कटिबद्ध असून स्थानिक युवकांना रोजगार व शेतकर्‍यांच्या हितासाठी विशेष अधिवेशन बोलावून येथील मतदारसंघाकरिता विकास निधी खेचून आणला जाईल. असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले. ते भाम धरणाच्या जलपूजन प्रसंगी शुक्रवारी काळूस्ते येथे बोलत होते.
इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या भावली धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर दहा दिवसानंतर उशिरा भाम धरण भरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पहिल्यांदाच इगतपुरी तालुक्यातील हे धरणे ओसंडून वाहत असल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त आहे. पंतप्रधान सिंचनयोजनेतून बांधलेल्या काळूस्ते परिसरातील भाम धरणाचे जलपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष तथा हंगामी अध्यक्षनरहरी झिरवळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते विधिवत जलपूजन केले.
प्रधानमंत्री सिंचन योजनेतून बांधलेले भाम धरण हे सलग तिसर्‍या वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केले. जवळपास अडीच टीएमसी क्षमतेचे असून ते पूर्ण यावेळी ओहरफ्लो झाले. या प्रसंगी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, नवी मुंबई नगरसेवक अरविंद नाईक, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, माजी जि.प. सदस्य जनार्दन माळी, गोरख बोडके, पांडुरंग शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, दौलत दुभाषे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण गायकर, कमलाकर नाठे, पोपट भागडे, मदन कडू, युवक तालुकाध्यक्ष पंकज माळी,अँड गणपत चव्हाण, मल्हारी गटकळ, भोलेनाथ चव्हाण, अनिता घारे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियानात सागर शिंदे, उपविभागीय अधिकारी अरुण निकम, शाखा अभियंता सुरेश
जाचक केतन पवार, प्रदीप पवार आदींनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -