घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपावसाचे माहेरघर सुखावले; भावली धरण ओव्हर फ्लो

पावसाचे माहेरघर सुखावले; भावली धरण ओव्हर फ्लो

Subscribe

दारणा धरणही ८० टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरू

इगतपुरी: तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण मागील वर्षापेक्षा दोन आठवडे अगोदरच भरले आहे. या धरणातून रविवारी सकाळी आठ वाजेपासून पाणी ओसंडून वाहत आहे. दरम्यान, दारणा धरणही ८० टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तालुक्याची अमृतवाहिनी समजल्या जाणार्‍या दारणा नदीच्या उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण शनिवारी पहाटेच्या सुमारास काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले. दरम्यान, तालुक्यात अधून मधून बरसणार्‍या पावसाने कालपासून चांगलाच जोर धरल्याने इतर धरणाच्या साठ्यात ही भरीव वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भावली, भाम, मुकणे, वैतरणा, दारणा, कडवा व वाकी या धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून, महत्त्वाचे समजल्या जाणार्‍या दारणा धरणातही ७८.३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दारणा धरणातून १२९१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -