घरमहाराष्ट्रनाशिकनिवडणूक खर्चात भुजबळांची आघाडी

निवडणूक खर्चात भुजबळांची आघाडी

Subscribe

लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून चार प्रमुख उमेदवारांच्या खर्चामध्ये तुर्तास राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून चार प्रमुख उमेदवारांच्या खर्चामध्ये तुर्तास राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. १८ एप्रिलपर्यंत भुजबळ यांनी २० लाख ७३ हजार ७२० रुपये खर्च केले आहेत. अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे खर्चात दुसर्‍या क्रमांकावर तर शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. कोकाटेंनी आतापर्यंत १३ लाख २४ हजार ९५६, तर गोडसे यांनी ११ लाख ४८ हजार ९३७ रुपये खर्च केले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारला ७० लाख रुपये खर्च करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून दररोज उमेदवाराने खर्चाचा तपशील आयोगाकडे द्यायचा आहे. काहींनी यापूर्वीच विलंब केला होता. तेव्हा आयोगाच्यावतीने त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. निवडणुकीतून माघार घेतली आहे, अशा उमेदवारांनाही खर्च आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. बहुतांश उमेदवारांनी खर्च सादर करण्यासाठी एका कार्यकर्त्याचीच नियुक्ती केल्याचे दिसून येते. उमेदवाराने सादर केलेल्या खर्चाच्या तपशीलाची शहानिशा करण्यासाठी एक स्वतंत्र पथक जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात आहे. प्रचारात वापरण्यात येणार्‍या प्रत्येक नगाचे दर ठरलेले आहेत. त्याचबरोबर चहापासून ते नाष्टा व जेवणापर्यंतचे दरही नक्की केले आहेत. त्यापेक्षा कमी दर जर उमेदवाराने सादर केले, तर आयोगाकडून ठरलेल्या दरानुसार हिशोब ठेवला जातो. प्रत्येक उमदेवाराने निवडणुकीदरम्यान तीन वेळेस खर्च निरीक्षकांकडून तपासून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील खर्च तपासणी पूर्ण करण्यात आली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी ७ लाख ४४ हजार ९२२ रुपये तर धनराज महाले यांनी ३ लाख ५० हजार ५३१ रुपये तर माकपचे आमदार जीवा पांडू गावित यांनी ५ लाख १४ हजार ७५१ रुपये खर्च केले आहे.

उमेदवारांचा खर्च असा

  • पवन पवार – ८९,८७३
  • प्रकाश कनोजे – २६,३१०
  • सुधीर देशमुख – ५१,८६०
  • देवीदास सरकटे – १२,७५०
  • विलास देसले – ३२,१६९
  • वैभव आहेर – १५,३६१
  • प्रियांका शिरोळे – २५,४८०
  • शरद धनराव – १४,६००
  • सोनिया जावळे – १५,६००
  • शरद आहिरे – २३,१६५
  • संजय घोडके – ३०,२४०
  • शिवनाथ कासार – २५,८६०
  • अ‍ॅड. टी.के बागूल – १,५०,५५०
  • दत्तू बर्डे – १८,१६९
  • हेमराज वाघ – २३,०१५
  • अशोक जाधव – १७,७००
  • बापू बर्डे – २०,७००
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -