घरमहाराष्ट्रनाशिकपरिवर्तन यात्रेतून भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

परिवर्तन यात्रेतून भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते आज नाशकात : जिल्हयात सहा ठिकाणी घेणार सभा

सत्ताधार्‍यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन यात्रेतून एल्गार पुकारला असून ही यात्रा नाशिकमध्ये दाखल होत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या माध्यमातून सरकारला आडवे हात घेत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी चालवली आहे. ही यात्रा भुजबळांच्या होमपीचवर असल्याने पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा १६ व १७ जानेवारीस जिल्ह्यात सहा ठिकाणी जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
या यात्रेत सरकारचा भ्रष्टाचार, कर्जमाफी, इंधन दरवाढ, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश, नागरी प्रश्न आदी मुद्दे घेण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. मध्यंतरी भुजबळ दोन ते अडीच वर्ष तुरुंगवासात असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती पिछेहाट झाली होती. भुजबळ पुन्हा सक्रिय होताच पक्षाला ऊर्जितावस्था झाली आहे. विविध सभांच्या माध्यमातून भुजबळांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. आगामी निवडणुकीत भुजबळ काका, पुतण्यापेैकी कोण मैदानात उतरणार याचा निर्णय झाला नसला तरी आज भुजबळांच्या होमपीचवर दाखल होणार्‍या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून भुजबळांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी चालवली आहे.

अशी असेल यात्रा

परिवर्तन यात्रा बुधवारी (दि. १६) सिन्नर येथील हुतात्मा चौक येथे येणार असून सकाळी ११ ला सभा होईल. त्यानंतर घोटीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दुपारी तीनला, सिडकोतील पवननगर स्टेडियम येथे सायंकाळी ६ ला सभा होणार आहे. त्यानंतनर गुरुवारी (दि. १७) दिंडोरी येथे सकाळी ११ ला, सायखेडा येथे दुपारी ३ ला सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ला मनमाडमधील आययूडीपीतील महर्षी वाल्मिकी स्टेडियम येथे सभा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -