विंचूरला पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

शिरवाडे : ५.६६ कोटींची कामे होणार, लासलगाव पोलीस ठाणे इमारत बांधकामास मंजुरी

विंचूर : देशातील ८० टक्के वाईन महाराष्ट्रातील असून जे मोसंबी, नारंगी तयार करतात त्यांचाच वाईन धोरणाला विरोध आहे. जगात स्वागताला वाईन दिली जाते, महाराष्ट्रात लाखामागे दीड, कर्नाटक ५ तर भाजपशाषित मध्यप्रदेशात ७ दारू दुकाने आहेत. मात्र राज्यात भाजप विरोध करते आहे हा भाजपचा दुटप्पीपणा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

काही लोक सात वर्षे झोपले होते. त्यांना देशातील समस्या दिसल्याच नाही ते आज जागे झाले आहेत, असा आण्णा हजारे यांना त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. सरपंच डॉ. श्रीकांत आवारे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिरवाडे गावातील कामांचा आढावा घेताना म्हणाले की, भुजबळांच्या माध्यमातून आपल्या गावाला विकास गंगा आली आहे. उपस्थित मान्यवरांचा शाल आणि बुके देऊन सरपंच डॉ. आवारे व त्यांच्या ग्रामपंचायत सहकारी व ग्रामस्थ यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

मौजे शिरवाडे येथे जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना, शिरवाडे ते आदिवासी वस्ती रस्ता काँक्रिटीकरण भूमिपूजन, मारुती मंदिर परिसर व ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत प्रभावती नगर येथे सामाजिक सभागृह लोकार्पण, जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी अनुषंगिक काम, एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेंतर्गत अंगणवाडी बांधकाम, जि.प.१५ वा वित्त आयोगस्तर विकासकामे अंतर्गत भूमिगत गटार व अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, आवारे वस्ती येथे स्ट्रीट लाईट, प्रभावती नगर येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती कामांचे लोकार्पण, १५ वा वित्त आयोग अंतर्गत भूमिगत गटार आदी ५ कोटी ६६ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

भुजबळ पुढे म्हणाले, मी २००४ साली नाशिक जिल्ह्यात पदार्पण केले तेव्हा जिल्हा परिषदेला केवळ ३६ कोटी निधी मिळत होता तो आता ८०० कोटी झाला आहे. मागील सरकारच्या काळात नाशिकचा निधी बाहेर पळवला गेला त्यामुळे विकासाचा अनुशेष अपूर्ण राहिला असून तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. गोवंश हत्या नको म्हणणारे भाजप गोव्यासारख्या राज्यात मुक्त गोवंश हत्येबाबत मूग गिळून आहेत. या देशात काय खावे काय परिधान करावे हेच ठरवणार. ज्यांना काम करायचे नाही ते नवीन विषय उकरून काढतात व हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून राजकारण करतात. हिजाब हा ओढणीसारखाच प्रकार असून त्यात वेगळे काही नाही. असे सांगत त्यांनी हिजाबचे समर्थन केले.

यावेळी नामदार भुजबळ यांचा लासलगाव येथे नूतन पोलीस ठाणे इमारतीस बांधकाम मंजुरी मिळाल्याबद्दल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जयदत्त होळकर, हरिश्चंद्र भवर, गयाबाई सुपनर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, ललित दरेकर, अशोक गवळी, लहानु मेमाणे, वसंत पवार, शिवाजी सुपनर, अनिल बोचरे, शांताराम जाधव, विजय सदाफळ, अशोक वाळुंज, ज्ञानेश्वर शेवाळे,सचिन दरेकर बाळासाहेब पुंड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, सरपंच डॉ. श्रीकांत आवारे, माणिक आवारे, गोरख शिंदे, अशोक आवारे, शशिकांत आवारे, सजन चिताळकर, सुनील शिंदे, मंडळ अधिकारी पंडित, अर्जुन गोसावी, उपअभियंता सा.बा.निफाड, संदीप कराड, गटविकास अधिकारी, निफाड, एस. आर. मिस्त्री, उपअभियंता पाणीपुरवठा, निफाड, रविकांत सानप सहाय्यक गटविकास अधिकारी, निफाड, जी.टी. ढिकले सा.बां. उपअभियंता जि.प. विभाग निफाड, आर.ए. फारुखी शाखा अभियंता बांधकाम विभाग, गणेश चौधरी, शाखा अभियंता सा.बा.विभाग निफाड, राजाराम मेमाने, विलास गोरे, पांडुरंग राऊत, मधुकर मंगेश गवळी, गोकुळ पाटील, बाळासाहेब लोखंडे, लोंढे नाना, विजय आवारे, किशोर चितळकर, गोरख आवारे, डॉ. प्रताप पवार, मनीषा आवारे, वैशाली पवार, वनिता घनघाव, विश्वनाथ आवारे, शशिकांत आवारे, निशिकांत चितळकर, अशोक चितळकर, पांडुरंग आवारे, संदीप आवारे, जगन आवारे, कारभारी चितळकर, सोहेल मोमीन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच डॉ. श्रीकांत आवारे यांनी तर सूत्रसंचालन मधुकर ठोंबरे यांनी केले.