भुसावळ पॅसेंजर दोन दिवस रद्द

मुंबईत पावसाच्या फटक्यामुळे भुसावळ पॅसेंजर दोन दिवस रद्द करण्यात आली

bhusawal train
फोटो प्रातिनिधिक आहे

मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका रेल्वेच्या वेळापत्रकाला बसल्याने भुसावळ पॅसेंजर दोन दिवस रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेने काही पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही एक्सप्रेसच्या मार्गात बदल केला आहे. त्या अंतर्गत भुसावळ-मुंबई पॅसेंजर (गाडी-५११५४ अप) शनिवार (दि. २९) आणि रविवार (दि. ३०) या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. ५११५३ डाऊन मुंबई- भुसावळ पॅसेंजर रविवार आणि सोमवारी (दि. १) रद्द करण्यात आली. ११०२५ अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस शनिवार आणि रविवारी नाशिकरोडऐवजी मनमाड-दौंड मार्गाने पुणे स्टेशनला पोहोचेल. तर, ११०२६ डाऊन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस शनिवार आणि रविवारी नाशिकरोड ऐवजी दौंड-मनमाड मार्गाने भुसावळ स्टेशनला पोहोचेल. रेल्वेच्या भुसावळ विभागाने ही माहिती दिली आहे.