घरमहाराष्ट्रनाशिकवाहन, प्लॅट विक्रीच्या वादातून दुचाकी पेटवली

वाहन, प्लॅट विक्रीच्या वादातून दुचाकी पेटवली

Subscribe

वाहन व प्लॉट खरेदीच्या वादातून एकाने दुचाकी पेटवली.

वाहन व प्लॉट खरेदीच्या वादातून एकाने दुचाकी पेटवली. ही घटना बुधवारी (ता.१७) रात्री ८.४५ ला ऋग्वेद सोसायटीच्या मागील बाजूस, भाभागनगर येथे घडली. याप्रकरणी विनोद नंदकिशोर कुकरेजा यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. मृण्मय राजेश कुलकर्णी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

विनोद कुकरेजा व मृण्मय कुलकर्णी यांच्यात वाहन विक्री व प्लॉट खरेदीचा आर्थिक व्यवहार होता. या व्यवहारातून दोघांमध्ये वादविवाद झाला. तु माझ्या आई-वडिलांशी आर्थिक व्यवहाराबाबत बोलू नको, नाहीतर मी कुठल्याही स्तरावर जाईल, असा दम मृण्मय कुलकर्णी याने कुकरेजा यांना दिला. विनोद कुकरेजा यांनी दुचाकी (एमएच १५, ए एन ०००९) ऋग्वेद सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली. त्यानंतर त्याने कुकरेजा यांच्या दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकत पेटवली, असे तक्रारीत म्हटले आहे. हवालदार अतीक इसाक शेख तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -