घरमहाराष्ट्रनाशिककुत्रे आडवे आल्याने दुचाकीचालक ठार

कुत्रे आडवे आल्याने दुचाकीचालक ठार

Subscribe

गाडीवरील दोघे जखमी; त्र्यंबकरोडवरील घटना

भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात एकजण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता.१६) मध्यरात्री त्र्यंबकरोडवरील न्यायाधिशांच्या बंगल्यासमोर घडली.

तुषार भाऊसाहेब शिंदे (रा. अशोकनगर,सातपूर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. गोलू ऊर्फ सौरभ उपेंद्र सिंग व दत्तात्रय कृष्णा गायकवाड (दोघेही रा.विंचुरे, ता.बागलाण) जखमी आहेत. तिघेजण दुचाकी (एमएच १५, एफवाय ६४७४) वरून भरधाव वेगाने त्र्यंबक रोडवरून सातपूरकडे जात होते. न्यायाधिशांच्या बंगल्यासमोर दुचाकी आली असता, अचानक कुत्रे दुचाकीसमोर आले. त्यात दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भाऊसाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. सौरभ सिंग व दत्तात्रय गायकवाड या दोघांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -