वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

मखमलाबाद शिवारातील बारीच्या उतारावर झाला अपघात

पेठरोडवर मखमलाबाद शिवारातील बारीच्या उतारावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शामराव बबनराव खालकर (३४, रा.भेंडाळी, ता.निफाड) यांचा मृत्यू झाला.

मखमलाबाद शिवार बारीच्या उतारावर आले असता अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने त्यात शामराव खालकर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी महेश दिलीप पिंगळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांनी घोषित केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.