घरमहाराष्ट्रनाशिकहेल्मेट चोरी ठरतेय डोकेदुखी

हेल्मेट चोरी ठरतेय डोकेदुखी

Subscribe

हेल्मेट सुरक्षा : खिशाला कात्री लावण्याऐवजी आपल्या हेल्मेटची काळजी घेणे गरजेचे असून लॉकचा वापर करणे आवश्यक आहे, कारण हेल्मेटमुळेच सुरक्षेची हमी मिळणार आहे.

नाशिक शहरात सोमवारपासून शहर पोलिसांनी हेल्मेट कारवाईत सातत्य ठेवल्याने विना हेल्मेटचालकांचे धाबे दणाणले आहे. अनेक दुचाकीचालकांनी हेल्मेट खरेदी केली आहेत. मात्र, आता अनेकजण हेल्मेटचोरीमुळे हैराण झाले आहेत. हेल्मेट चोरीस गेल्यामुळे दुचाकीचालक हेल्मेट वापरणार्‍यास टाळाटाळ करीत असल्याचे ‘आपलं महानगर’च्या पाहणीत समोर आले आहे. एकंदरीत खिशाला कात्री लावण्याऐवजी आपल्या हेल्मेटची काळजी घेणे गरजेचे असून लॉकचा वापर करणे आवश्यक आहे, कारण हेल्मेटमुळेच सुरक्षेची हमी मिळणार आहे.

‘सर सलामत तो पगडी पचास’ ही जुनी म्हण आहे. मात्र, आधुनिक जगात दुचाकीवरच्या प्रवासात सर सलामत ठेवण्यासाठी हेल्मेटची गरज आहेे. हेल्मेट चोरीच्या वाढत्या घटनांमुळे दुचाकीस्वार पुरते हैराण झाले आहेत. शहरात सोमवार (ता.१३) पासून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे झाले आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्किंग करताना हेल्मेट चोरी सर्रास होत आहे. घाईमध्ये हेल्मेट दुचाकीवरतीच ठेवण्याची दुचाकीस्वारांची चूक हेल्मेटचोरांसाठी आयती संधी ठरते आहे. हेल्मेट चोरीमुळे महाग हेल्मेट खरेदी न करता रस्त्यावरती स्वस्तातले हेल्मेट खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. हेल्मेटसक्ती न्यायालयाने केली असल्यामुळे वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले आहे. एकंदरीत खिशाला कात्री लावण्याऐवजी आपल्या हेल्मेटची काळजी आपण घेणे हे महत्वाचे आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट सक्ती न समजता जबाबदारी म्हणून हेल्मेट नियमित वापरण्यासाठी लॉकचा वापर केल्यास हेल्मेटचोरीला आळा बसेल.

- Advertisement -

सलग चार वर्षांपासून हेल्मेटची सवय

पोलिसांच्या धाकाने हेल्मेट विकत घेतले आणि पुढे हेल्मेटची सवयच जडली. पहिले हेल्मेट ४ वर्षे वापरल्यानंतर नवे हेल्मेट खरेदी केले. सवयीप्रमाणे हेल्मेट दुचाकीच्या हॅन्डेलला लावून हॉटेलात जेवणास गेलो आणि बाहेर आलो तेंव्हा हेल्मेट चोरी झाल्याचे समजले. पुन्हा दुसरे हेल्मेट घेतले. तेसुद्धा चोरीस गेले आहे. मात्र, हेल्मेटविना गाडी चालवण्याची सवय नसल्याने हेल्मेट व लॉकसोबत विकत घेतले आहे. – अनिल पाटील, व्यवसायिक

पुन्हा नवे हेल्मेट लॉकसह घेतले

हेल्मेट सुरक्षेसाठी गरजेचे असल्याने दुचाकी खरेदी करतानाच हेल्मेटसुद्धा खरेदी केले. कामानिमित्त वकीलवाडीत आलो. पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करत हेल्मेट हॅन्डेलला अडकवून दुकानात गेलो. दुकानातून बाहेर आलो, तेव्हा हेल्मेटचोरी झाल्याचे लक्षात आले. अनेक महिने हेल्मेटविना काढले. मात्र, हेल्मेट सुरक्षेसाठी गरजेचे असल्याचे अनुभव आला. त्यामुळे पुन्हा नवीन हेल्मेट आणि लॉक खरेदी केले आहे. – आदेश वानखेडे, दुचाकीचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -