घरमहाराष्ट्रनाशिकसुरगाण्यात रस्त्यांसंदर्भात भाजपचे उपोषण

सुरगाण्यात रस्त्यांसंदर्भात भाजपचे उपोषण

Subscribe

हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा भाजपचा आरोप

पाच महिन्यांपासून रखडलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाकडे वारंवार मागणी करूनही हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन महाले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.

दुसरे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या होळी चौक ते अपना बेकरी असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम निर्धारित आराखड्याप्रमाणे झाले नाही. या ठिकाणी आणून टाकलेली खडी निकृष्ट दर्जाची आहे. आऊटलाईन न करता रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेले गटारीचे काही पाईप फुटले आहेत. परिणामी उताराच्या बाजूने असलेल्या घरांमध्ये गटारीचे पाणी घुसण्याचा प्रकार घडला आहे.

- Advertisement -

मुळातच या रस्त्याच्या कामाला मोठा विलंब करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे काम रखडले आहे. मुख्य रस्ता वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराने बारा दिवसात रस्ता पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रस्ता पूर्णच काय पण पाव इंच देखील काँक्रिटीकरण झाले नाही. वॉर्ड क्रमांक एक व दोनमधील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सर्वच रस्तेकामांची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरात पिण्यासाठी गढूळ पाण्याचा नळाद्वारे पुरवठा केला जात असून स्वच्छ पाणी देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

येत्या चार पाच दिवसात रस्त्याचे काम योग्य रीतीने सुरू न झाल्याने तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा न केल्याने २२ जूनपासून याच रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी बसून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करून उपोषण सुरू केले. उपोषणात भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले, भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, भावडू चौधरी, बाळकृष्ण सूर्यवंशी, छोटूशेठ दवंडे, संजय पवार, योगेश चव्हाण, दिनकर पिंगळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -