Tuesday, March 2, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक पक्षप्रवेशाचा धडाका, नाशिकमधून अनेक कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

पक्षप्रवेशाचा धडाका, नाशिकमधून अनेक कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी झाला प्रवेश सोहळा

Related Story

- Advertisement -

मनसे नेते तथा माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वाखाली भाजपसाठी काम केलेल्या काही शिक्षकांनी बुधवारी (दि.११) मनसेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा प्रवेश सोहळा झाला.

नाशिकमधील शिक्षकांसह येवला शहरातल्या मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मनसेचा ध्वज हाती घेतला. नाशिक महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात मनसेनेही पुन्हा एकदा ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं यानिमित्तानं दिसून आलं. ठाणे आणि वसई-विरारमधल्या शेकडो भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांनी कालच प्रवेश केला आहे.

- Advertisement -