भाजपच्या मधुबाला खिराडकर सेनेत

त्यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यात भाजप कमकुवत

BJP's Madhubala Khiradkar join Shiv Sena

भाजपच्या नांदगाव पंचायत समिती सदस्या तथा गट नेत्या मधुबाला खिराडकर यांनी समर्थकांसह आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मधुबाला खिराडकर या मागील पंचवार्षिक निवडणुकीत जातेगाव गणातून निवडून आल्या होत्या. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यात भाजप कमकुवत झाली असून सेनेला बळकटी मिळणार आहे.
यावेळी डॉ. रावसाहेब खिराडकर, काकासाहेब बागुल रोहिले बुद्रुक, बाबासाहेब अर्बुज रोहिले बुद्रुक, चांगदेव पगारे जातेगांव, शेषराव पवार परधाडी, दादा पवार परधाडी, यांच्यासह समर्थकांनी सेनेत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांनी सर्वांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, विलास आहेर, संतोष गुप्ता, विष्णू निकम, राजाभाऊ जगताप, तालुका प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, सागर हिरे, गुलाब चव्हाण, प्रदीप सूर्यवंशी, मारुती सोनवणे, ज्ञानेश्वर नवले, चंद्रभान जाधव, सुरेश सूर्यवंशी आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.