घरमहाराष्ट्रनाशिकशिक्षण समितीवर कमळ फुलले; धनुष्य भात्यात

शिक्षण समितीवर कमळ फुलले; धनुष्य भात्यात

Subscribe

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला कवेत घेण्यासाठी भाजपने फडकविलेल्या मदतीच्या झेंड्याला धुडकावून लावत शिवसेनेने शिक्षण समितीत विरोधी बाकावर बसणे पसंत केले. शनिवारी (दि. २९) झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी भाजपच्या प्रा. सरिता सोनवणे तर उपसभापतीपदी प्रतिभा पवार विजयी झाल्यात. त्यामुळे या समितीवर भाजपचे कमळ फुलल्याचे स्पष्ट झाले असून सेनेला आपले धनुष्य मात्र भात्यातच ठेवावे लागले आहे.

तब्बल पावणे दोन वर्षानी मुहर्त लागलेल्या शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला बालकल्याण समितीच्या सभागृहात पार पडली. समितीत भाजपकडे ५, शिवसेनेकडे ३ तर काँग्रेसकडे एक सदस्य होते.त्यामुळे भाजप उमेदवारांची निवड होईल हे निश्चित होते. सर्वप्रथम सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी भाजपकडून प्रा. सोनवणे तर शिवसेनेकडून सुदाम डेमसे निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या १५ मिनिटांच्या मुदतीत दोन्हीपैकी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदान प्रक्रिया राबविली गेली.

- Advertisement -
हे वाचा – निफाडचा पारा ० अंशावर; द्राक्ष बागांना फटका

सर्वप्रथम शिवसेनेचे डेमसे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. डेमसे यांना स्वत:सह समितीतील शिवसेनेचे संतोष गायकवाड व चंद्रकांत खाडे यांनी मतदान केले. तर कॉँग्रेसचे राहुल दिवे मात्र मतदान प्रसंगी अनुपस्थित राहिले. यानंतर प्रा. सोनवणे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत स्वत: सोनवणे यांच्यासह दिनकर आढाव, वर्षा भालेराव, प्रतिभा पवार व स्वाती भामरे यांनी हात उंचावून मतदान केले. प्रा. सोनवणे यांना पाच तर डेमसे यांनी अवघी तीन मतं मिळाल्याने दोन मतांच्या फरकाने भाजपच्या प्रा. सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मात्र कॉँग्रेसचे दिवे उपस्थित झाले. यावेळेस शिवसेनेचे संख्याबळ मात्र वाढले. यावेळीही गायकवाड यांनी माघार न घेतल्याने हात उचांवून मतदान घेण्यात आले. भाजपच्या प्रतिभा पवार यांनी पाच तर शिवसेनेच्या संतोष गायकवाड यांना चार मते मिळालीत.त्यामुळे पिठासन अधिकार्‍यांनी पवार यांच्या विजयाची घोषणा केली.

हे वाचा – शिक्षण समिती निवडणूक : भाजपने अंथरलेले रेड कार्पेट सेनेने लाथाळले

या समितीती भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूकही भाजपने जिंकली. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती प्रा. सोनवणे व उपसभापती पवार यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -