घरमहाराष्ट्रनाशिकशुक्रवार ठरला नाशिकसाठी ब्लॅक फ्रायडे

शुक्रवार ठरला नाशिकसाठी ब्लॅक फ्रायडे

Subscribe

कर्जाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील विविध तीन शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्या आणि दोन अपघातांमध्ये गेलेेले पाच बळी यामुळे शुक्रवार १८ जानेवारी हा नाशिकच्या दृष्टीने ब्लॅक फ्रायडे ठरला.

कंधाणे येथील ज्ञानेश्वर शिवणकर (वय ३२) या तरुण शेतकर्‍याने कांदा शेती तोट्यात गेल्याने शेतातील कांद्याच्या ढिगावर बसून विष प्राशन करुन आत्महत्या केली.तर नांदगाव (बु) येथील चेतन केदा बच्छाव ( वय. २३ ) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. तसेच सायने (खु.) येथील शेतकरी वसंत पाटील ( ४५ ) यांनी देखील विषप्राशन केल्याने शुक्रवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर, संगमनेरजवळ ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात सांत्रस कुटुंबातील किशोरवयीन मुलगा व जावयी यांचा जागीच मृत्यू झाला, चारजण गंभीर जखमी झाले. तर, चांदवडमध्ये कंटेनरच्या धडकेत मोपेडवर चाललेल्या पती पत्नीसह मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -