घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंधश्रद्धेचा काळाबाजार : पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांवर कारवाई

अंधश्रद्धेचा काळाबाजार : पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांवर कारवाई

Subscribe

वन विभाग : समुद्री जीवांपासून तयार केलेल्या १५ ट्रॉफी जप्त

अंधश्रद्धेपोटी सर्रासपने समुद्री जीवांषह घोरपडसारख्या वन्यजीवांच्या अवयवाच्या वापर करत बनविलेल्या ट्रॉफींची विक्री करणार्‍या पंचवटीतील पूजा साहित्य विक्री करणार्‍या दोन दुकानांत नाशिक पूर्व वन विभागाच्या पथकांनी धडक कारवाई केली. या दुकानातून समुद्री जीवांपासून तयार केलेल्या १५ ट्रॉफी, ४९० नग ‘ब्लॅक कोरल्स आणि सी फॅन्स’ म्हणजे इंद्रजाल जप्त करण्यात आले आहे. वन विभागाने दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

राजेश लक्ष्मण येवले (वय ५२) व तेजस प्रवीण सोनार (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

इंद्रजाल (ब्लॅक कोरल्स आणि सी फॅन्स) हे सागरी जीव असून, ‘गूडलक चार्म’ या नावाने अंधश्रद्धेसाठी त्यांची बाजारात विक्री होत असल्याची माहिती वनाधिकार्‍यांना मिळाली. घोरपडीच्या अवयवांपासून तयार केलेल्या हातजोडी-पायजोडी, इंद्रजाल, शिंपले, कवड्या, देवदार वृक्षाची बी, हळदीची बी आणि समुद्री नारळाचा वापर करून तयार केलेल्या ट्रॉफी व मोरपिसे जप्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एक ट्रॉफीची किंमत ३ हजारांपासून पुढे आहे. वन विभागाने संशयित दुकानमालक राजेश लक्ष्मण येवले व रामसेतू पुलाजवळील गणेश वस्त्र भांडारचालक संशयित तेजस प्रवीण सोनार यांना अटक केली. दोघांना येवला न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -