Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम नाशिक शहरात संचारबंदीपाठोपाठ नाकाबंदी

नाशिक शहरात संचारबंदीपाठोपाठ नाकाबंदी

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरात रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनीही २२ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान संचारबंदी काळात शहरात नाकाबंदीचे नियोजन केले आहेे. शहर पोलिसांची रात्रगस्तही वाढवण्यात येणार आहे.

शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने रात्री ११ ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनीही नियोजन केले आहे. पोलिसांनी संचारबंदी काळात रात्रगस्त आणि नाकाबंदी सुरु केली आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणेनिहाय महत्वाच्या पॉइंटवर नाकाबंदी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याठिकाणी बॅरिकेडींगचा वापर करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, गुटखा, तंबाखू सेवन करण्यास किंवा थुंकण्यास बंदी करण्यात आली आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी नियमांचे पालन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. नियम मोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त पाण्डे्य यांनी आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -