Nashik : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवारांची नाशिक आयुक्तपदी नियुक्ती

Nashik : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवारांची नाशिक आयुक्तपदी नियुक्ती

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची बदली करण्यात आली आहे. म्हाडामध्ये सात हजार सदनिकांच्या संभाव्य घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नाशिक आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत आयुक्त कार्यालयात रमेश पवारांनी अनेक वर्ष उपायुक्त म्हणून सेवा बजावली आहे. आता ते सह आयुक्त या पदावर आहेत.

नगरविकास विभागाच्या माध्यमातून २२ मार्च २०२२ रोजी रमेश पवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जारी केले आहे. प्रशासकीय कारणास्तव ही नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी मुंबई सहआयुक्तपदावरुन कार्यमुक्त व्हावे तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारण्यात यावी असे म्हटलं आहे. तसेच कार्यभार स्वीकारल्यानंतर अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे म्हटलं आहे.

नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधवांची बदली

म्हाडाच्या सदनिकांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप नाशिक आयुक्त कैलास जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आयुक्तांच्या बदलीचे आदेश दिले होते. यानंतर आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आयुक्त कैलास जाधव यांच्यावर आरोप केला होता. महानगरपालिकेच्या विकासकांनी म्हाडाला जे फ्लॅट दिले होते ते दिले नाहीत. महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे ३५०० फ्लॅट म्हाडाला मिळणार होते परंतु ते मिळाले नाही आणि यामुळे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


हेही वाचा : नारायण राणेंना मोठा दिलासा, निकाल विरोधात गेल्यास 3 आठवडे कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश