घरमहाराष्ट्रनाशिकमिठाईत झुरळ टाकून उकळली खंडणी

मिठाईत झुरळ टाकून उकळली खंडणी

Subscribe

सीसीटीव्हीमुळे झाला खंडणीचा भांडाफोड

नाशिक : शहरातील दोन मिठाई व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून एका युवकाने खंडणी वसुलीचा धक्कादायक प्रकार उघडकी आला आहे. स्वीट मार्टमध्ये मिठाई खरेदीच्या बहाण्याने जायचे आणि मिठाईत झुरळ टाकून त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन मिठाई विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करणार्‍या खंडणीखोराविरोधात गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीसाठी संशयिताने वापरलेली शक्कलीचे मिठाई विक्रेत्यानेच भांडाफोड केल्याने हा प्रकार समोर आला आहे. अजय राठोड उर्फ अजय राजे ठाकूर असे संशयित खंडणीखोराचे नाव आहे.

ऑगस्ट महिन्यात पहिली घडली. रतन पुनाजी चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथील सागर स्वीट हे मिठाई विक्री दुकानात १९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी अजय राठोड हा बासुंदी खरेदीसाठी आला. मात्र, बासुंदीमध्ये झुरळ असल्याचे सांगून त्याने त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि अन्न व औषध प्रशासनकडे माहिती देण्याची त्याने धमकी दिली. तसे करायचे नसेल तर त्याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानुसार एक लाख रुपये २० ऑगस्ट रोजी सागर स्वीटच्या कार्यालयात घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

- Advertisement -

मनीष मेघराज चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संशयित अजय राजे ठाकूर हा मधुर स्वीटमध्ये रबडी खरेदीसाठी आला. त्याने रबडीमध्ये झुरळ असल्याचे सांगून त्याचा व्हिडीओ केला आणि पूर्वीप्रमाणेच धमकावत स्वीट मार्टचे मॅनेजर पुखराज चौधरी खंडणीची मागणी केली. त्यासाठी त्याने ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान अजय राजे ठाकूर यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल, मेसेज करुन व्हिडीओ व्हायरल आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
सावरकर नगरच्या मधुर स्वीटमध्ये खंडणीखोराने केलेला प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. मनीष चौधरी यांनी या घटनेनंतर दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयित स्वीटमध्ये झुरळ टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -