घरमहाराष्ट्रनाशिकवाचन संस्कृती वाढीसाठी तालुकास्तरावर ग्रंथोत्सव

वाचन संस्कृती वाढीसाठी तालुकास्तरावर ग्रंथोत्सव

Subscribe

नाशिक : समाजामध्ये वाचन संस्कृती वाढावी. साहित्याची ओळख व वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाते. कालानुरूप ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून शहरासोबतच तालुका पातळीवर वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, प्रतिपादन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर हॉलमध्ये उच्च व तंत्रशिक्षण ग्रंथालय संचलनालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय नाशिक ग्रंथोत्सव -२०२२ चे उदघाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार नाना बोरस्ते, वसंत खैरनार, वैद्य विक्रांत जाधव, गिरीश नातू, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सचिन डोखळे, कविता महाजन उपस्थित होते. प्रारंभी सारडा कन्या विद्यामंदिर व मराठा हायस्कूलच्या विद्यार्थीनीनी स्वागतगीत व ग्रंथगीत सादर केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल कविता महाजन यांनी आभार मानले.

- Advertisement -
ग्रंथदिंडीने वाढविली ग्रंथोत्सवाची शोभा

ग्रंथदिंडी सार्वजनिक वाचनालय ते टिळकपथ, रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ पॉईन्ट, मेनरोड, चांदीचा गणपती व पुन्हा सार्वजनिक वाचनालय या मार्गावर आयोजित करण्यात आली. दिंडीत सारडा कन्या विद्यामंदिर, रूंगठा हायस्कूल, पेठे विद्यालय, मराठा हायस्कूल, शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, माध्यमिक विद्यामंदिरचे लेझीम पथक, वाय. डि. बिटको बॉईज हायस्कूल, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळया वेशभूषेत सहभागी झाले होते.

ग्रंथांच्या संगतीमध्ये मिळणारा आनंद मोठा असतो. सामाजिक संस्थांनीही वाचन वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जे हातात पडेल ते वाचत रहावे. वाचनातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडत जातो. विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड जोपासावी. : जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त

गावोगावी ग्रंथांचा प्रसार व्हावा, वाचकांनी त्यांचा आस्वाद घ्यावा, यासाठी गावोगावी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, यासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. : अजय शहा, अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -