नाशिक शहरात पहिल्याच दिवशी ३८८६ जणांना बूस्टर डोस

वयोवृद्ध नागरिकांसह हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार (दि.१०) पासून कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस) मात्रा अर्थात बूस्टर डोस देण्यास ६०९ सेंटरवर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात तीन हजार ८८६ जणांनी बूस्टर डोस देण्यात आला. यामध्ये १ हजार ९४९ हेल्थ केअर वर्कर, १ हजार फ्रंटलाईन वर्कर आणि ७७५ वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे.

राज्यातील सर्व शासकीय, महापालिका व खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवारी (दि.१०)पासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस) मात्रा अर्थात बूस्टर डोस दिला जात आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे.

खबरदारी म्हणून दोन डोस घेतलेल्यांना देशभरात सोमवारपासून (दि.१०) बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही सुरुवातीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: बूस्टर डोस घेत इतरांनाही बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार शहरभरात ही प्रक्रिया सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात ६०९ लसीकरण सेंटरवर कोरोना प्रतिबंधक लसीसह हेलथ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात दररोज लसीकरण केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.
– डॉ. आनंद पवार, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी