Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र शिवजयंतीचा फलक लावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

शिवजयंतीचा फलक लावताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

अवकाळी पावसाने पडलेले शिवजन्मोत्सवाचे होर्डिंग उचलत असताना वीजेच्या तारांच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास वडनेर दुमाला येथे घडली. वडनेर दुमाला येथील अक्षय किशोर जाधव (वय 28), सौभाग्यनगर, लॅम रोड येथील राज मयुरेश पाळदे (वय 26) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

नाशिक शहरात शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी वादळी पावसामुळे शिवजन्मोत्सवानिमित्त ठिक-ठिकाणी लावलेल्या होर्डिंगची पडझड झाली. वडनेर दुमाला गावातही काही होर्डींग पडलेले होते. ते उचलून पूर्ववत करत असताना होर्डिंगच्या लोखंडी फ्रेमचा वीजेच्या तारांना धक्का लागला. वीज प्रवाह लोखंडी फ्रेमला उतरल्याने राज पाळदे व अक्षय जाधव यांना वीजेचा जोरदार धक्का लागला. त्यांना उपचारासाठी तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -