घरताज्या घडामोडीVideo: नाशिकमध्ये बस-रिक्षाचा अपघात; दोन्ही वाहन विहिरीत कोसळून २० मृत

Video: नाशिकमध्ये बस-रिक्षाचा अपघात; दोन्ही वाहन विहिरीत कोसळून २० मृत

Subscribe

मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाटा येथे धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला. मंगळवारी (दि.२८) दुपारी एसटी बस आणि रिक्षात भीषण अपघात झाला आहे. कठडा तोडून रिक्षा आणि बस विहिरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून जखमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घटनास्थळी मदतीसाठी ग्रामस्थांनी गर्दी केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी घटनास्थळी उमराणे, सौंडाणे, माळेगावफाटा, नांदुरी, देवळा, सटाणा, नांदगाव येथील ८ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मदतकार्यही सुरू आहे. जखमींवर रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्राथमिक उपचार करत रुग्णालयात दाखल केले जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -