घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोर परिरक्षण भूमापक अधिकारी गजाआड

लाचखोर परिरक्षण भूमापक अधिकारी गजाआड

Subscribe

शासकीय कामासाठी घराचा नकाशा आणि उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२१) नगर भूमापन कार्यालय, सायखेडा (ता.निफाड) येथे परिरक्षण भूमापकास अटक केली. अनिल हरीभाऊ शेळके असे अटक करण्यात आलेल्याने परिरक्षण भूमापकाचे नाव आहे.

शासकीय कामासाठी घराचा नकाशा आणि उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे अनिल शेळके यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. गुरुवारी (दि.२१) नगर भूमापन कार्यालय, सायखेडा येथे तक्रारदाराकडून तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच घेताना अनिल शेळके यास अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -