घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाऊचा बाण अन् चर्चेला उधाण; बंटी-बबलीने आपले खरे नाव वापरुन फिरावे, योगेश...

भाऊचा बाण अन् चर्चेला उधाण; बंटी-बबलीने आपले खरे नाव वापरुन फिरावे, योगेश घोलपांची खोचक पोस्ट

Subscribe

नाशिक : राज्यातील सत्तासंघर्ष दिल्लीत सुरु असल्याने शिवसेनेतील फूट पक्षीय पातळीवर मर्यादित न राहता अनेक राजकीय घराण्यात फूट पडली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. देवळाली मतदारसंघात काही दिवसांपूर्वी घोलप कन्येने भाजपात प्रवेश करत घोलपांना धक्का दिला आहे. देवळालीत महिला इच्छुकांची संख्या अधिक असून, अनेक महिला इच्छुक आपले माहेरचे आडनाव लावत आहेत. यावर माजी आमदार योगेश घोलप यांनी निशाणा साधत सोशल मीडियावर ‘बंटी-बबलीने आपले खरे नाव वापरुन फिरावे’ अशी खोचक पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

देवळाली मतदारसंघात आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, कॅन्टोन्मेंट च्या लोकनियुक्त सदस्या प्रितम आढाव, तहसीलदार राजश्री अहिरराव, घोलप कन्या तनुजा, माजी आमदार दिवंगत भिकचंद दोंदे यांची मुलगी सुवर्णा दोंदे आदींसह अनेक इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी घोलप कन्या तनुजा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत घोलप कुटुंबाला धक्का दिला. यावर बबनराव घोलप यांनी मुलीचे लग्न झालेय, त्यांनी त्यांचे आडनाव वापरावे अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर गुरुवारी माजी आमदार योगेश घोलप यांनी सोशल मीडियावर ‘बंटी-बबलीने आपले खरे नाव वापरुन फिरावे’ अशी खोचक पोस्ट केली, या टिकेचा बाण योगेश यांनी नेमका कोणावर सोडला असावा, याबाबत सोशल मीडियावर दिवसभर उलटसुलट चर्चा होती.

- Advertisement -

आमदार सरोज अहिरे यांचा विवाह निवडणुकीनंतर झाल्याने त्यांच्याबाबत वरील वाक्य लागू होण्याची शक्यता फारच कमी आहे. प्रितम आढाव या अविवाहित असल्याने त्यांचाही संदर्भ नसावा, उर्वरित इच्छुक तहसीलदार राजश्री अहिरराव या माहेरचे आडनाव लावत असून, सासरचे आडनाव गांगुर्डे आहे. मात्र, मतदारसंघात त्या एकट्याच फिरत असतात. आमदार सरोज अहिरे यांचे अपत्य लहान असल्याने त्या पती किंवा सासूसोबत असतात. अन्यथा, त्या एकट्याच जनसंपर्कात असतात. प्रितम आढाव यांचे लग्न झालेले नसल्याने घोलपांच्या पोस्टचा त्यांच्याशी संबंध येत नाही. तहसीलदार अहिरराव याही एकट्यानेच फिरत असतात. बहीण तनुजा यांच्या भाजपा प्रवेशाने घोलप कुटुंब दुखावले गेल्याची चर्चा आहे. मात्र, योगेश घोलप यांची पोस्ट वडील बबनराव घोलपांच्या प्रतिक्रियेच्या सुरात सूर मिसळणार्‍या टिकेच्या बाणाची दिशा चर्चेचा विषय ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -