घरमहाराष्ट्रनाशिकनगरपरिषद अर्थसंकल्प मंजुरीच्या कात्रीत

नगरपरिषद अर्थसंकल्प मंजुरीच्या कात्रीत

Subscribe

जिल्ह्यातील बहुतांश पालिका अडचणीत

दोन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयातर्फे अर्थसंकल मंजूर न केल्यामुळे मनमाड नगरपरिषदेसह जिल्ह्यातील बहुतांश पालिका अडचणीत सापडल्याचे वृत्त आहे. एकाप्रकारे या पालिकांचे कामकाजच ठप्प झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी लवकरात लवकर अर्थसंकल्प मंजूर करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी करत आहे.

मनमाड नगरपरिषदेच्या फेब्रुवारीत आलेल्या विशेष सभेत 2019-20 च्या वार्षिक अर्थसंकल्प बहुमताने मंजूर केल्यानंतर हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयात पाठविण्यात आला आहे. अर्थसंकल्प पाठवल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करून पाठवण्याची प्रथा आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी व आचारसंहिता लागलेली होती त्यामुळे पालिकेचे अर्थसंकल्प अडकून पडले होते. मात्र, आचारसंहिता संपून बराच काळ झालेला असताना देखील जिल्हाधिकारी कार्यलयात मनमाडसह इतर नगरपालिकेचे अर्थसंकल्प अडकून पडले आहे. अर्थ संकल्प जोपर्यंत मंजूर केले जात नाही; तोपर्यंत पालिका प्रशासनाला जनरल फंडातील रक्कम खर्च करता येत नाही. यामुळे मनमाड नगरपरिषदेसह जिल्ह्यातील अनेक पालिकांचे एकाप्रकारे कामकाज ठप्प झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -