घरताज्या घडामोडीबांधकाम व्यावसायिक दीपक चांदेंकडून साहित्य संमेलनास २५ लाखांची मदत

बांधकाम व्यावसायिक दीपक चांदेंकडून साहित्य संमेलनास २५ लाखांची मदत

Subscribe

नाशिक शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बांधकाम व्यवसायिक दीपक कल्याण चांदे यांनी तब्बल 25 लाखांची मदत करणार आहेत. चांदे यांनी रविवारी (दि.३१) ५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ व पदाधिकांर्‍याकडे सुपूर्द केला.

बांधकाम व्यावसायिक दीपक चांदे हे नाशिक शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येणार्‍या साहित्य संमेलनाच्या कमानींसाठी आर्थिक मदत करणार आहेत. त्यांच्या फर्ममध्ये असलेली वाहने पाहुण्यांना ये-जा करता यावी, यासाठी उपलब्ध करुन देण्यात आहे. त्यांनी २ व ४ डिसेंबर रोजी होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आर्थिक भार उचलला आहे. त्यांच्या हॉटेलमधील खोल्या पाहुण्यांसाठी विनामुल्य देणार आहेत. नाशिक शहराची जडघडण भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ठ्यासुद्धा व्हावी, यासाठी आर्थिक मदत करत आहे. आगामी काळात मदत लागल्यास देण्यासाठी तयार आहे, असे चांदे यांनी पदाधिकार्‍यांना सांगितले. यावेळी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, निधी संकलन समिती प्रमुख रामेश्वर कंलत्री, सदस्य नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटील, शंकर बोर्‍हाडे, संजय करंजकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नाशिकच्या अनेक नामवंत कलाकारांनी, साहित्यिकांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुळात नाशिककर कलाप्रेमी, साहित्यप्रेमी रसिकवृत्तीचे आहेत. हे मागच्या साहित्य संमेलनाला नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादातून दिसून आले. लक्ष्मी आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या नाशिक नगरीला यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद लाभले आहे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. संमेलनास नाशिककर रसिक साहित्यिक फराळ व मेजवानीचा आनंद लुटतील. प्रायोजकत्वाच्या नात्याने खारीचा वाटा उचलण्याची व साहित्य दिंडीतील सेवेकरी होण्याची संधी मिळाली आहे.
– दीपक चांदे, दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, नाशिकरोड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -