घर महाराष्ट्र नाशिक दुष्काळमुक्तीसाठी नाशिक जिल्हयात ‘बुलढाणा पॅटर्न’

दुष्काळमुक्तीसाठी नाशिक जिल्हयात ‘बुलढाणा पॅटर्न’

Subscribe

दुष्काळमुक्तीसाठी बुलढाण्यात राबविण्यात येणारे गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम प्रकल्पाचा पॅटर्न नाशिक जिल्हयामध्ये राबविण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले. शासन, खासगी संस्था व लोकसहभाग (पीपीपी) अशीही एक जलसंधारणाची नवी चळवळ जिल्हयात हाती घेण्याचा मानस जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

दुष्काळमुक्तीसाठी बुलढाण्यात राबविण्यात येणारे गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम प्रकल्पाचा पॅटर्न नाशिक जिल्हयामध्ये राबविण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले. शासन, खासगी संस्था व लोकसहभाग (पीपीपी) अशीही एक जलसंधारणाची नवी चळवळ जिल्हयात हाती घेण्याचा मानस जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. याकरीता काही सामाजिक संस्थांशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भीषण दुष्काळाची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. दुष्काळ मुक्तीसाठी बुलढाण्यात राबविण्यात येणारे गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम बुलढाणा प्रकल्पाचा पॅटर्न नाशिक जिल्हयात राबविण्याबाबत आग्रही असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

बुलढाणा येथे भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने राबविलेल्या सुजलाम सुफलाम मोहिमेमुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठया प्रमाणात रोजगारनिर्मितीही झाली आहे. या माध्यमातून गाळ काढण्यात येणार्‍या गावातील स्थानिकांनाच रोजगार उपलब्ध करून दिला. संघटनतर्फे ३६० विविध पदांच्या नियुक्त्याही केल्या आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधीही मिळाली. याच धर्तीवर शासन, खाजगी संस्था आणि लोकसहभागातून ही चळवळ अधिक व्यापक करण्यात येणार आहे. या अभियानासाठी टाटा ट्रस्ट, अनुलोम, युवा मित्र या संघटनांनी तयारी दर्शवली असून लवकरच या अभियानाला सुरूवात करण्यात येणार आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये थंडीचा कहर

गाळ अल्पभूधारक शेतकर्‍यांना

- Advertisement -

प्रकल्पामधून काढलेला गाळ अल्पभूधारक शेतकर्‍यांना देण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनासुद्धा हा गाळ टाकून आपली शेतजमीन सुपीक करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमुळे जलाशयांमधील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात येत असल्याने शेती सुपिक होण्याचे भरीव काम देखील मार्गी लागणार आहे.

अनुदानाऐवजी इंधन

गाळमुक्त धरण अभियानासाठी शासनामार्फत इंधनासाठी अनुदान दिले जाते. मात्र आता अनुदान देण्याऐवजी त्या त्या तालुकास्तरावर पेट्रोलपंप चालकांशी करार करून थेट त्या गावांना जेसीबीसाठी इंधनच देण्याचा विचार सुरू आहे. यावर संबधित तहसिलदाराचे नियंत्रण असेल. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -